कराड उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी अण्णांचा नेहमी प्रयत्न असतो युवा वर्गाला सोबत घेऊन अण्णा आज अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. कराड उत्तर मतदार संघामध्ये आज रोजगाराचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे अनेक सुशिक्षित युवकांना व युवतींना रोजगार नसल्यामुळे व हाताला काम नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिक्षणाचाही प्रश्न खूप गंभीर आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये चांगल्या शिक्षण सुविधा नसल्याची कमतरता जाणवत आहे त्यामुळे कराड उत्तर मधील अनेक गावातील मुलांना शिक्षणासाठी दुरचा प्रवास करावा लागत आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पिण्याचा प्रश्न हा खूप गंभीर आहे. सदन व समृद्ध भाग असून सुद्धा आज अनेक गावांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी वेळेवर मिळणे अवघड झाले आहे यावर आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेतृत्वाने लक्ष दिलेले नाही व तसा प्रयत्न केलेला नाही. आज कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची दूर अवस्था ही एक मोठी समस्या बनलेली आहे. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. दळणवळणासाठी गावातील, शेतातील तसेच दुसऱ्या गावाला जोडणारे रस्ते अतिशय दुरावस्थेत आहेत याकडेही आज कोणीही लक्ष देत नाही.
मतदार संघातील अनेक गावांमध्ये गटार व्यवस्था व कचरा व्यवस्थापन व्यवस्था नसल्यामुळे दुर्गंधी पसरते व त्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते. अनेक गावांमध्ये आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे गावातील लोकांना खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी कराडला प्रवास करून जावे लागते आहे व तेथे त्यांची आर्थिक पिळवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे.
हा आरोग्यवस्थेचा प्रश्न सोडवणे आजपर्यंत कारण उत्तर विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही नेत्याला शक्य झाले नाही. प्रत्येक गावामधील सरकारी रुग्णालये अतिशय दुरावस्थेत आहे येथे आरोग्य व्यवस्था वेळेवर उपलब्ध होत नाही सर्वसामान्य व गोरगरीब लोकांना या अडचणीमुळे जीवही गमवावा लागतो.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्नही खूप महत्त्वाचे आहेत प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणी आहेत शेतकरी सोसायटीमधील प्रश्न असतील व शेती संबंधित प्रशिक्षण या संदर्भामध्ये कोणतेही काम झालेले दिसत नाही.
महिलांच्या रोजगारासंबंधातील प्रश्नही अगदी ऐरणीवर आहे महिलांना रोजगार मिळण्यासाठी व त्यांना आपल्या कुटुंबासाठी व उदरनिर्वाहासाठी छोटे मोठे व्यवसाय उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
अनेक प्रश्न आहेत जे सोडवण्यासाठी कराड उत्तर मतदारसंघांमध्ये अण्णांसारख्या नेतृत्वाची गरज आज निर्माण झाली आहे.