आणि हा स्वार्थ व्यक्तीच्या तसेच समाजाच्या हिताचाही कसा असेल हे ज्याला कळतं तोच चांगला नेता होऊ शकतो. आणि कुटुंबाच्या हितासाठी स्वत:चा स्वार्थ, समाजाच्या हितासाठी कुटुंबाचा स्वार्थ बाजूला ठेवायची ज्याची तयारी असतो तोच आदर्श नेता असतो. आणि हे सर्व गुण दिसतात ते श्री. कुलदीप अण्णा क्षीरसागर यांच्या व्यक्तीमत्वात. अडचणीतच नव्हे तर आनंदाच्या काळातही श्री. कुलदीप अण्णा क्षीरसागर कधीही चुकीचे निर्णय घेत नाहीत. कोणत्याही व कोणाच्याही दबावाखाली ते काम करत नाही. त्याचे निर्णय हे पूर्वग्रहदूषित नसतात आणि स्वार्थाने बरबटलेलेही नसतात. ते कायम कणखर असतात आणि त्याची ही कणखरता त्याच्या प्रत्येक कृतीतून जाणवते. म्हणूनच एक युवा तडफदार व खंबीर कणखर नेतृत्व म्हणून आपण कुलदीप अण्णा क्षीरसागर यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये साथ देणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी 24 तास उपलब्ध असणारा माणूस जर विधानसभेमध्ये गेला तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाहीत. हा एकच ध्यास घेऊन युवा व तडफदार नेते श्री. कुलदीप अण्णा क्षीरसागर यांना विधानसभा निवडणुकीमध्ये भरपूर मतांनी विजयी करा आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी त्यांना एक संधी द्या.