मु.पो.चिखली, तालुका – कराड, जिल्हा – सातारा

Awesome Image

" कितीही संकटं येवोत, इरादे असतील बुलंद,
ध्येय साध्य करायचं आहे, राहीन न थांबता अखंड !!"


" श्री. कुलदीप अण्णा क्षीरसागर यांचा जन्म 14 डिसेंबर 1984 " रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील चिखली या छोट्याशा गावी शेतकरी कुटुंबामध्ये झाला झाला. अगदी सर्वसामान्य जीवन जगत असताना अण्णांना आपले ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण करता आले. हे शिक्षण पूर्ण करत असताना समाजामधील अनेक प्रश्नांची त्यांची ओळख होत गेली. गोरगरिबांचे अनेक प्रश्न त्यांना पावलोपावली दिसत होते याच काळात त्यांनी आपण या गोरगरीब व वंचित लोकांसाठी काहीतरी करू शकतो याची त्यांना जाणीव होत गेली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अण्णांनी छोटा मोठा व्यवसाय करत सामाजिक कार्याकडे जास्त भर दिला व राजे प्रतिष्ठान मध्ये काम करण्यास सुरुवात केली. छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांनी प्रेरणास्थान व मार्गदर्शक म्हणून स्वीकारले. छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल अगदी लहानपणापासून खूप आदर होता त्यांचे विचार आणि आचार नेहमी स्मरणात ठेवून अण्णांचे कार्य चालू आहे.


श्री .कुलदीप अण्णा क्षीरसागर यांच्याकडे आपल्या जनतेच्या भल्यासाठी भविष्यात येणार्‍या गोष्टींचा विशेषत: संकटांचा अंदाज लावण्याची क्षमता आहे. त्यानुसार त्या संकटाचा सामना करण्यासाठी ते आवश्यक ती उपाययोजनाही करून ठेवतात. दूरदृष्टीचा अभाव असलेली माणसं स्वत:सोबत आपल्या अनुयायांनाही अडचणीत आणतात. पण श्री. कुलदीप अण्णा क्षीरसागर यांची कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावाचा अभ्यास व त्या गावांच्या विकासासाठीची दूरदृष्टी हा त्यांच्यातील उत्कृष्ट नेतृत्वाचा गुण सिद्ध करतो.


तळमळ लोककल्याणाची-

सामाजिक कार्य करत असताना अण्णांना गावातील अनेक प्रश्नांची जाण होत गेली चिखली गावांमधील सर्व प्रश्न व अडचणी दूर करण्यासाठी स्वतः ग्रामपंचायत पॅनेल लढवण्यासाठी 2010 मध्ये ते राजकारणामध्ये उतरले. कोणताही अनुभव व राजकीय पाठबळ नसतानाही गावांमध्ये स्वतः पॅनेल लावणे म्हणजे खूप मोठे काम होते व धाडसाचे होते परंतु अण्णांनी हे धाडस करण्याचे ठरवले यश अपयश या गोष्टी प्रयत्नानंतरच निष्पन्न होतात हे त्यांना माहीत आहे. गेली दहा ते पंधरा वर्षे त्यांनी हा संघर्ष गावामध्ये सुरू ठेवला आणि शेवटी ग्रामपंचायत मध्ये सत्ता मिळवण्यात 2021 व 22 च्या पंचवार्षिक निवडणूक मध्ये यश मिळवले आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये अनेक विकास कामे चालू आहेत. राजकारणामध्ये उतरल्यानंतर त्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वत्र काम करण्याचे ठरवले व ते आजतागायत काम चालू आहे.

Awesome Image
  • 1.ग्रामीण आधारभूत सुविधांचा शाश्वत विकास करणे.

  • 2.सामाजिक कार्य/ सामाजिक योगदान करणे.


  • 3. ग्रामीण भागातल्या युवती व महिलांसाठी विविध प्रकारच्या कौशल्यावरती आधारित असं प्रशिक्षण देणे.


  • 4. सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी महारोजगार मेळाव्याचं आयोजन राखणे.


  • 5. मुलगी शिकली प्रगती झाली आहेत.


  • 6. महिला बचत गटाचे फेडरेशन स्थापन.